पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथील शेतकी संघाची निवडणूक साठी दि ४ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात ९८ टक्के असे भरघोस मतदान झाले. मतदानानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतु आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार गटाने सर्व तर्क वितर्कांना पुर्ण विरांम देत विरोधी गटाला धक्का देत सर्व १५ जागांवर विजय मिळविला आहे. शेतकी संघाची निवडणूक हि दोन्ही गटांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. एकीकडे भाजपा, राष्ट्रवादी, उबाठा तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे होते. या निवडीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकाला नंतर शहरातील विविध मार्गांवरुन सहकार गटाच्या वतीने जेसीबी वरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, चतुर बाबुराव पाटील, शिवसेना शिंदेगटाचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, देवगावचे सरपंच समिर पाटील, सर्व विजयी उमेदवार व अनेक कार्यकर्ते सामिल झाले होते.