जैन हिल्स येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे 2 दिवसीय राज्य अधिवेशनाचे उद्घाटन…

0

 

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नैतिक मुल्ये जपुन, ग्राहकांना उत्तम सेवा, समाधान, गुणवत्ता, माफक किंमत यामुळे उद्यौग, व्यापारात प्रगती होते. व्यापारी देखील ग्राहकच असतो. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व भवरलाल(मोठेभाऊ)यांची मैत्री थोर होती. विद्यार्थी ग्राहक चळवळ राबवा, संघटीत व जागरुक ग्राहक निर्माण होणे, काळाची गरज आहे, असे प्रसिद्ध उद्योजक अशोक भवरलाल जैन म्हणाले. येथील जैन हिल्सच्या गांधीतीर्थ मधील कस्तुरबा सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे 2 दिवसीय राज्य अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अशोक भवरलाल जैन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डाॅ विजय लाड, शहर वाहतुक जळगांव शाखेचे लिलाधर कानडे, जळगांव सायबर पोलीस विभाग प्रमुख बी डी जगताप, वैधमापनचे बाळासाहेब जाधव, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्यसचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्य सहसंघटक सौ मेधाताई कुलकर्णी, राज्य कोषाध्यक्ष सौ सुनिता राजेघाटगे, राज्य कार्यकारीणी सदस्य प्रा सुरेश पाटील,नाशिक विभाग अध्यक्ष डाॅ अजय सोनवणे,विभाग संघटक संजय शुक्ला(भुसावळ),विभाग सचिव प्रा डाॅ ए बी महाजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कार्य म्हणजे साधना,विष्णुकार्य होय.सजग ग्राहक प्रबोधन चळवळ महाराष्ट्रभर राबविणार.कर्मयोगी,साहित्यिक,प्रथितयश उद्योजक भवरलालजी जैन व ग्राहकतीर्थांच्या आठवणी,ॠणानुबंधांना उजाळा अध्यक्षीय मनोगतातुन राज्याध्यक्ष डाॅ विजय लाड यांनी दिला.

विदर्भ प्रांताध्यक्ष शामकांत पात्रीकर यांच्या ग्राहक न्याय मासिक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.अर्थव्यवस्थेचे पंचप्राण सन्मान म्हणुन सौ रजनी भगवतीप्रसाद बाजपेयी(जळगांव यांचा श्रमिक,श्री विलास महादेव देसाई(वैभववाडी)यांचा शेतकरी,श्री अजित  नाईक(तुळजापुर)यांचा व्यापारी,श्री अशोक भवरलाल जैन (जळगांव)यांचा उद्योजक तर श्री. बाळासाहेब जौंदाळ ग्राहक म्हणुन स्मृतीचिन्ह,शाल,सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.प्रास्ताविक.अरुण वाघमारे,सुञसंचालन संजय शुक्ला, ग्राहकगीत…आभार प्रा डाॅ AB महाजन पसायदान. सौ मेधाताई कुलकर्णी यांनी गायिले.

उद्घाटन सञा नंतर राज्य सहसंघटक सौ मेधाताई कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कार्यपद्धती व रचना,तर राज्यसंघटक श्री सर्जेराव जाधव यांनी शेतकरी ग्राहक प्रबोधन यांवर मार्गदर्शन केले.तदनंतर राज्य टिमच्या मार्गदर्शनात,सर्व अध्यक्ष,सर्व संघटक,सर्व सचिव,सर्व कोषाध्यक्ष आदींच्या स्वतंञ कक्षात बैठकांचे सञ अभ्यास व माहितीपुर्ण संपन्न झाले.ग्राहकतीर्थ,स्वातंञ्यसेनानी स्व बिंदुमाधव जोशी(नाना)यांच्या डाॅक्युमेंटरीने राज्य अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली

राज्य अधिवेशन यशस्वितेसाठी डाॅ विजय लाड व राज्य टिमच्या मार्गदर्शनात, नाशिक विभाग अध्यक्ष डाॅ अजय सोनवणे यांच्या नेतृत्वात,विभाग संघटक संजय शुक्ला,विभाग सचिव प्रा ए बी महाजन,विभाग सहसंघटक अॅड सुरेंद्र सोनवणे,विभाग सहसचिव श्रीकांत(बाबा)पाठक,जळगांव जिल्हाध्यक्ष मनोज जैन, जिल्हासंघटक सतिष गढे,जिल्हासचिव उदय अग्निहोत्री,जळगांव तालुकाध्यक्ष महेश चावला, अस्थिरोगतज्ञ डाॅ नितीन धांडे, गुरुबक्ष जाधवानी,डाॅ अविनाश सोनगीरकर ,विलास एकनाथ वाणी,…आदी संयोजन करीत आहेत

 

Leave A Reply

Your email address will not be published.