वरणगाव आयुध निर्माणीने घेतले पन्नास क्षय रुग्णांना दत्तक…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत या अभियानांतर्गत सामाजिक दायित्व निधीतून आयुध निर्माणीने पन्नास क्षय रुग्ण दत्तक घेऊन, क्षयरोग केंद्र जळगाव ग्रामीण निक्षत्र मित्र पोषण आहाराचे महाव्यवस्थापकांच्या हस्ते वाटप करून अभियानाची सुरुवात केली.

वर्षानुवर्षा पासुन असलेला क्षयरोग (TB) आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जाऊन रुग्णांनाचे निदान केले जाते. त्याचाच एक भाग प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत या योजने अंतर्गत वरणगाव आयुध निर्माणी कडून सामाजिक दायित्व निधीतून सामाजीक बांधीलकी जोपासत परिसरातील पन्नास रुग्णाना दत्तक घेत निर्माणीच्या कम्युनिटी सभागृहात महा व्यवस्थापक अजय कुमार सिंग याच्या हस्ते तीन महिन्याचे निक्षत्र मित्र पोषण आहाराचे वाटप करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी आयुध निर्माणी ही देशाच्या संरक्षण विभागासाठी दारूगोळा व शस्त्र तयार करण्यासाठी  मर्यादीत न राहता, निर्माणी सामाजिक बाधीलकीही जोपासत वेगवेगळे समाजीक उपक्रम राबवित असते. या पुढे ही राबविणार असून “प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत” या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील रुग्णांना निक्षत्र मित्र तीन महिन्याचे पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असून भविष्यात जिल्ह्यातील सर्व रुग्णांना अशा प्रकारचे पोषण आहार देऊन जिल्ह्यातून क्षयरोग मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अजय कुमार सिग यांनी सांगितले. तर जागतिक आरोग्य सल्लागार डॉ विशाल पाटील यांनी अगदी डायनासोराच्या शरीरात शुद्धा क्षयरोग असल्याचे दाखला देत समुपदेशन केले.

या प्रंसगी मंचावर सहायक व्यवस्थापक महेश शिंदे, डॉ हर्षद लांडे हे प्रमूख उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्माणीचे विलास पाटील, किरण निकम, दिपक संदान्षु, किशोर मराठे, संजय मराठे, जळगाव जिल्हा क्षयरोग केद्राचे प्रमूख, व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.