सोन्याची झळाळी पोहचणार 55 हजारापर्यंत.. तपासा आजचे नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेनमधील युद्धाचे (Russia Ukraine War) पडसाद आंतरराष्ट्रीय व्यवहारावरसह भारतीय बाजारपेठेवरही उमटताना दिसताय. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस सोने चांदीच्या दरात चढ उतार होताय. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने वधारत आहे. काल (4 मार्च) रोजी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात पुन्हा वाढ झाली होती. सोन्याचा दर 53,000 हजार प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर आज 68,600 प्रति किलोवर पोहोचला होता. तर आज (5 मार्च) रोजी सोन्याचा दर 53,920 हजार प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर आज 70,540 प्रति किलो आहे.

55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात सोने 55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सध्या सोने 53 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे पोहोचले आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. रशिया युक्रेनमधील युद्ध सुरु होताच आर्थिक व्यवस्थादेखील ढासळू लागली आहे. सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे.

जळगावमधील दर
सोने 53920
चांदी 70540

नाशिकमधील दर
सोने 53750
चांदी 71340

औरंगाबादमधील दर
सोने 54200
चांदी 70790

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.