सोन्याच्या किमती वाढणार ! जाणून घ्या कारण..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या दरात आज अचानक मोठा बदल झाला आहे. सोने -चांदीच्या आयातीवर  लावण्यात येणाऱ्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये म्हणजे आयात शुल्कामध्ये आता 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता सोन्या-चांदीच्या आधीच जास्त असलेल्या किंमती आता आणखी वाढणार आहेत.

देशात आधीच दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. त्यात आणखी भर पडली आहे. जीवनावश्यक गोष्टी तर महाग झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक झळ बसत आहे. यामध्ये आधी 7.5 टक्के असलेला हा कर आता 12.5 टक्के इतका झाला आहे. सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून सरकारनं हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.सध्या देशातील व्यापारामध्ये तोट्याचं प्रमाणही सातत्यानं वाढत आहे. मे महिन्यात उद्योग व्यापारातील हे नुकसान 24. 29 बिलियन डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचले होते.

त्यामुळेच सोन्यावरील आयात कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात गेल्या 10 वर्षांमध्ये सगळ्यांत जास्त सोनं 2021 मध्ये आयात केलं होतं. कोरोनाच्या साथीमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली होती. लोकांनीही सोन्याची भरपूर खरेदी केली होती. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी देशातील मोठ्या ज्वेलर्सनं इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.