विधानसभा सभापतीसाठी राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपचे आमदार राहुल राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र्र विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशन 3 जुलैपासून सुरु होत आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.

राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचेच खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.