सोने झळाळले ! गाठला जानेवारीतील सर्वोच्च दर ; चांदीही चकाकली !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दराने आज २४ रोजी जानेवारी महिन्यातील सर्वोच्च दराची पातळी गाठली असून सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ५७ हजार २५० इतके झाले असून काल २३ जानेवारीच्या तुलनेत आज मंगळवारी १९० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर किलोमागे ६८,४२० रुपये नोंदवला गेला. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात २८० रुपयांची वाढ झाली.

लग्न सराईमुळे सोन्या चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे जाणकार सांगतात. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढला, तर चांदीचा दरातही भाववाढ झाली. होता. शुक्रवारी, मंगळवारी २४ जानेवारी रोजी सोन्याचा भाव ५७,,२५० रुपये तर चांदीचा भाव ६८,४२० रुपये होता. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव १०७ रुपयांनी वाढून ५४,२२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

Leave A Reply

Your email address will not be published.