धक्कादायक ; मेहुणीवर तब्बल आठ महिने बलात्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूर- पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून जावयाने अल्पवयीन मेहुणीवर तब्बल आठ महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दाम्पत्याला अटक केली आहे
पीडित मुलगी नववीत शिकते. लग्नाला नातेवाईकांचा विरोध होता. दोघांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी बहिणीसोबत राहायला लागली. दरम्यान, राजाची एका भोंदूबाबासोबत ओळख झाली. त्याने त्याला पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले.
अल्पवयीन मेहुणीशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर राजाने युट्यूबवर पैशांचा पाऊस कसा पडतो याबाबत सर्च केले. भोंदूबाबाच्या प्रभावात आल्याने याबाबत तिलाला सांगितले. तिने बहिणीसोबत संबंध ठेवण्यास होकार दिला.
राणीने अल्पवयीन बहिणीला संबंध ठेवण्यास बाध्य केले. त्यानंतर आठ महिन्यांपर्यंत राजा याने मेहुणीचे शोषण केले. पैशांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे पीडित मुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. राजा हा तिला मारहाण करायला लागला. मुलीची प्रकृती खालावली. त्यानंतर नातेवाईकाला माहिती मिळताच त्यांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी अल्पवयीन मुलीन राजा हा तिचे शोषण करीत असल्याचं नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर मुलीसह नातेवाईकांनी नरखेड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन राजा आणि राणीला अटक केली. पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायलयाने दोघांची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.