कॉग्रेसचे “हात से हात जोड़ो” अभियान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल- येथे तालुका व शहर कॉग्रेस कमिटीतर्फे “हात से हात जोड़ो” अभियायानाची सुरवात असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाने करण्यात आली आ. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदचे माजी गटनेते व यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांची प्रमुख उपस्थित होती
शेतकी संघ यावल येथून हात से हाथ जोडो अभियान सुरू करून पंचशील नगर, इस्लामपुरा,सईदपुरा मार्गे डोअर टू डोअर आबालवृद्ध, महिला, युवक,व सर्वच जातीधर्मातील सर्वच घटकातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या व त्यावर लवकरच उपायजोजना करण्याचे निश्चित करण्यात आले व काही समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या सदर अभियानात अनेक महिला बघिनींनी मान्यवरांचे औक्षण करून सत्कार केला सदर आजच्या पहिल्या दिवसाचे अभियानाचे यावल शहरातील बुरुज चौकात समारोप झाले यावेळी शहराध्यक्ष कदिर खान यांनी या अभियानात सर्व सहभाग घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले .
सदर हात से हात जोडो अभियान आजपासून पुढील दोन महिने सुरू राहणार असून या अभीयांनाच्या माध्यमातुन तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे विचार, प्रसार, जनतेपर्यंत पोहचवले जाणार आहे.
सदर अभियानाच्या आजच्या सुरवातीला निरीक्षक इम्रान खान, भगतसिंग पाटील,शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड,शहराध्यक्ष कदिर खान, कोरपावली माजी सरपंच जलील पटेल,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे,फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख,रेशनिंग सेलच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, गुलामरसुल, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, युवक तालुकाध्यक्ष फैजान शाह, विक्की गजरे, नईम शेख ,सकलेन शेख, डॉ. योगेश पालवे, विजय वारे, किरण सोनवणे, तुषार सोनवणे, शाम मेघे, भुरा शाह,धीरज सोनवणे, अभिषेक इंगळे, सुनील बिरारी सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.