केएल राहुल- अथिया शेट्टी यांचे विवाह बंधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
सातारा – भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज विवाह बंधनात अडकले. केएल राहुल- अथिया या दोघांचा विवाह सोहळा काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळीसोबत सातारा येथील खंडाळा फार्महाईसवर मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाहाला क्रीडा क्षेत्रातील आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.
याआधी खंडाळा येथे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनी कॅमेऱ्यासमोर येवून मुलांची लवकरच भेट घालणार असल्याची माहिती दिली होती. यावरून आज मंगळवारी (दि. २३) रोजी केएल राहुल- अथिया शेट्टी यांचा विवाह होणार असल्याची हिट मिळाली होती. नुकताच हा लग्न सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळणार अशी आशा आहे.
केएल राहुल- अथिया यांचा विवाह पार पडल्यानंतर अथियाचे वडील सुनील शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टीने फार्महाऊसमधून बाहेर येवून लोकांना मिठाई वाटली आहे. या विवाहाला क्रिकेटपटू विराट कोहली, युवराज सिंह, जहीर खान, हरभजन सिंह, मंसूर अली खान पटौदी, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहसिन खान, क्रिकेटर इशांत शर्मा, अंशुला कपूर याच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.