लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . यादिवशी विविध वस्तूंच्या खरेदीसह सोन्या चांदीचे दागिने विकत घेण्याला प्राधान्य दिले जाते . मात्र मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून सोन्याच्या दराने उसळी घेतली.
सोने १० ग्रामला ५६ हजार २३० असे होते. तर चांदीचा दर किलो प्रमाणे ६८ हजार ५७० रुपये इतका होता. १२ जानेवारी रोजी सोन्याचा दर ५६ हजार १० रुपये असताना यात आज २२० रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा दर किलोमागे ६८ हजार ६९० होता मात्र चांदीच्या दरात आज १२० रुपयांची घसरण होऊन चांदी स्वस्त झाली.
मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येत असून गेल्या आठवड्यापेक्षा १३ जानेवारीला सोन्याच्या दराने सर्वोच्च दर गाठला आहे. तर चांदी त्यामानाने स्वस्त झाली असल्याचे दिसून आले