सोन्याच्या दरात वाढ ; चांदीत घसरण

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सुवर्णगरीत सोन्याच्या दरात वाढ झाली असून सोन्याच्या दरात शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रति १० ग्राम सोन्याचा दर हा १८० रुपयांनी वाढून ५५ हजार ७६० रुपये इतका झाला . तसेच चांदीच्या दरातही आज किलोमागे १४० रुपयांची घसरण होऊन चांदी ६४ हजार ३९० रुपये इतका भाव दुपारी दोन वाजेपर्यंत जळगावच्या सराफा बाजारात पाहायला मिळाला. सध्या सोने चांदीची गुंतवणुकीवर ग्राहकांकडून भर दिला जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ञानी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.