जनतेशी सामाजिक बांधिलकी कायम ठेवा – डॉ.उल्हास पाटील

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

उपचारादरम्यान रुग्णांशी निर्माण होणार्‍या डॉक्टरांच्या नात्यात जिव्हाळा असायला हवा. त्यानंतर आयुष्यभर त्याने तुमची आठवण ठेवली म्हणजे समजा तीच तुमच्या कामाची पावती आहे. तसेच यशस्वी व्हायचे असेल तर जनतेशी सामाजिक बांधिलकी कायम ठेवा असा मोलाचा सल्‍ला गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी दिला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, फिजीओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दि.२३ रोजी केतकी हॉल येथे उत्सवमूर्ती डॉ.उल्हास पाटील यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोदावरी परिवाराच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आई, उत्सवमूर्ती डॉ.उल्हास पाटील यांच्यासह गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील, श्री व सौ डॉ.सुहास बोरोले यांची विशेष उपस्थीती होती.मान्यवरांचे स्वागत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, फिजीओथेरपी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, होमिओपॅथी प्राचार्य डॉ.डी.बी.पाटील, आयुर्वेदचे डिन डॉ.हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, मेट्रन संकेत पाटील, एन.जी.चौधरी, फिजीओथेरपीचे रजिस्ट्रार राहूल गिरी यांच्यासह रुग्णालयातील सर्वच डॉक्टर, विद्यार्थी, टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफ व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थीती होती.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण करुन प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. याप्रसंगी कु.सारा वैभव पाटील ह्या चिमुकलीच्याहस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी मनोगत व्यक्‍त करुन उत्सवमूर्तींबद्दलचा आदरभाव व्यक्‍त केला. याप्रसंगी पुढे बोलतांना उत्सवमूर्ती डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले की, दर दिवशी सकाळी दिवसभरातील कामांचे नियोजन करायला हवे, दररोज थोडी का होईना प्रगती करायला हवी, ज्या दिवशी प्रगती झाली नाही तो दिवस व्यर्थ गेला असे समजा. तसेच स्वत:ची ओळख निर्माण करा, त्याकरीता कुठल्याही एका विषयात पारंगत व्हा, त्याकरीता सकाळपासून जोमाने कामाला लागला असे आवाहन डॉ.उल्हास पाटील यांनी करत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.