रिंगणगाव येथे घरफोडी ५३ हजारांचा ऐवज लांबविला

0

एरंडोल ;- तालुक्यातील रिंगांगाव येथे अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप उघडून घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना १८ रोजी सकाळी ९ ते दुपारी साडेचार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, चेतन उत्तम महाजन हे नोकरीला असून त्यांच्या रिंगण गाव येथील राहत्या घरातून १८ रोजी सकाळी ९ ते दुपारी साडेचार दरम्यान अज्ञात चोरटयांनी
३,५००/- रु कि.ची अंदाजे १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ जु. वा. ३,५००/- रु कि ची अंदाजे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पिंपळपान)३,५००/- रु कि ची अंदाजे १ ग्रॅम वजनाची १ सोन्याची अंगठी ३,५००/- रु कि ची अंदाजे १ ग्रॅम वजनाची १ सोन्याची बाह्या , १४,००० / कि ची अंदाजे ४ ग्रॅम वजनाची ८ सोन्याची बाह्या (प्रत्येकी अर्धा ग्रॅमची १ १०,५००/- रु कि अंदाजे ३ ग्रॅम वजनाची ६ सोन्याची अंगठ्या (प्रत्येकी अर्धा ग्रॅमची १ , ८००/- रु कि ची अंदाजे २ भाराची १ चांदीची साखळी ८) १४००/- रु कि ची अंदाजे ३ भाराची १ चांदीची साखळी ९) २८००/- रु कि ची अंदाजे ७ भाराचे चांदीचे ब्रेसलेट १०) १८००/- रु कि ची अंदाजे ४.५० भाराच्या चांदीच्या पाटल्या ११) १६०० /- रु किची अंदाजे ४ भाराच्या चांदीच्या ४ पाटल्या (प्रत्येकी १ भारची १ , ८०० /- रु कि ची अंदाजे २ भाराचे चांदीचे पायातले २ कडे १३) ५००० /- रु रोख ५०० दराच्या १० नोटा असा एकूण ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला . चेतन महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ जुबेर खाटीक करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.