यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
विस्तारीत भागातील नवीन नळ धारकांना मागील थकबाकी या सदराखाली १६२० रू जास्तीची पाणीपट्टी पालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने आकारले होते. पालिकेची ही मागणी बेकायदेशीर होती. नवीन नळ धारकांना पाणीपट्टी बिल मिळाल्यानंतर जागरूक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचेशी संपर्क करून सदर बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावर अतुल पाटील यांनी तत्काळ पालिकेस पत्र देऊन त्याबाबत अवगत केले होत. त्यानुसार पालिकेने मायनेट प्रणाली ऐवजी महा यू एल बी प्रणाली सिस्टीम मध्ये सदर नळ धारकांचा समावेश करुन तांत्रिक चुकीमुळे पाठविण्यात आलेली थकबाकी रक्कम रद्द केलेली आहे त्यामुळे या रद्द केलेल्या पाणीपट्टीचा यावल शहरातील असंख्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे
काय म्हणाले अतुल पाटील
सजग नागरिक यांचे मुळे हा प्रश्न प्रशासनासमोर मांडता आला व त्याला यश मिळाले. विस्तारीत भागातील ३२८ नळ धारक यांचे प्रत्येकी १६००रू रक्कम वाचवता आली म्हणून समाधानी आहे.