अज्ञात चोरट्याने घरफोडी करून अंगणात लावलेली दुचाकीही चोरली

0

अमळनेर ;- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून रोकड व दागिने चोरून घराच्या शेजारी अंगणात लावलेली १५ हजार किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार १४ ते २० ऑगस्ट दरम्यान शास्त्री नगर येथे घडला . याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी कि, शहरातील शास्त्रीनगर भागात राहणारे नितीन भालचंद्र पवार यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रोख आणि ३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेत त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या माधवराव बडगुजर यांची १५ हजार किमतीची दुचाकी क्रमानं एम एच १९- ७९१८ चोरून नेली . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना घनशाम पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.