सलमान त्याच्या ‘या’ लूक मुळे चर्चेत, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उताराला आहे. सलमानचा फोटो पाहून ‘तेरे नाम २’च्या तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहे.

भाईजानचा गजनी लूक व्हायरल
सलमान खान २० ऑगस्टला मुंबईत एका पार्टीत गेला होता. त्यावेळी अभिनेत्याचा गजनी लूक पाहायला मिळाला. काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानचा डॅशिंग लूक पाहून चाहत्यांना २० वर्षांपूर्वीच्या भाईजानची आठवण झाली.

सलमानच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या कमेंट्स
सलमानखानच्या नव्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भाई का जलवा, भाईजान जवानच प्रमोशन करत आहे. तेरे नाम अगेन २,ला भाईजानची सुरुवात, अशा कमेंट्स काही कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.