‘ताली’: बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी

0

 

लोकशाही विशेष लेख

‘ताली’ वेबसिरिज पाहण्याचे प्रमुख कारण ‘सुष्मिता सेन: गौरी सावंत’. जिओ सिनेमाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या गाजत असलेली ‘ताली’ वेबसिरिज, ही निर्माते कार्तिक निशानदार व लेखक क्षितीज पटवर्धन यांनी प्रेक्षकांसमोर आणली आहे. ६ एपिसोडमध्ये वेबसिरीज बनविली आहे.

‘ताली’, गौरी सावंत यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित वेबसिरीज असून, गौरी सावंत यांची भूमिका सुष्मिता सेन साकारताना दिसणार आहेत. गौरी सावंत या एक ट्रान्सजेंडर असून समाजात वावरताना त्यांना प्रत्येक टप्प्यातून आलेल्या समस्या या वेबसिरीजमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत.

गणेश सावंत हा अगदी सामान्य कुटूंबातला मुलगा, एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात अगदी शिस्तप्रिय वाढत होता. पण त्याच्या अंतर्गत शरिरातील घडामोडी पाहता त्याला त्याच्या विरुद्ध असलेल्या जेंडरचे आकर्षण वाढत चालले होते. त्याला ‘आई’ व्हायचं होतं, स्त्री बनायचं होतं. गणेशच्या बदलाची आणि तिथून पुढे समाजाशी, व तो ज्या समाजात वावरणार होता त्या समाजातील लोकांशी सुद्धा लढण्याचा संघर्ष या वेबसिरीज मध्ये मांडला आहे.

गौरी सावंत यांना लहाणपणापासूनच स्त्री होण्याचे आकर्षण होते. खरंतर त्यांना आई’ व्हायचं होतं. आणि अशा काही घटना या नैसर्गिक सुद्धा असू शकतात. पण स्वतःच्या घरापासून ते समाजासमोर ताट मानाने उभे राहण्याचा संघर्ष हा गणेश पासून ते गौरी सावंत पर्यंत कसा होता, हे ‘ताली’मधून पहायला मिळते.
ज्यांना हक्काचे घर नाही, आधार कार्ड नाही की वोटिंग कार्ड सुद्धा नाही. अशा तृतीयपंथींय समाजातील लोकांना आपल्या देशात कुठेच स्वतःचा हक्क दाखविता येत नाही. पण आपल्या समाजातील लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी त्या प्रत्येक वेळी लढा देत होत्या.

गौरी सामंत यांनी एलजीबीटीक्यू समुदायासाठी (तृतीयपंथीय) २०१३ मध्ये ‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण’ National Legal services Authority [NALSA] साठी याचिका केली होती. ट्रान्सजेंडरच्या हक्कासाठी त्या लढत होत्या, आणि पुढे त्यांनी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून अधिकृतपणे ट्रान्सजेंडर व्यक्तींना समाजात स्थान मिळवून दिले. एक आई होण्याचं स्वप्न ते तृतीपंथीयांच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी लढणाऱ्या गौरी सावंत या एका सुंदर स्त्रीची बायोग्राफी ‘ताली’ (जीवनपट) मधून पहायला मिळते.

एक प्रेक्षक म्हणून पाहताना सुष्मिता सेन यांनी ही भूमिका वठवताना खूप मेहनत घेतलेली पहायला मिळते. कारण समाजात एक स्त्री म्हणून वावरताना आणि एक साधारण स्त्रीचे आयुष्य जगत असताना बराच फरक पडत असतो. पण एका व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध व्यक्तिमत्व साकारावयाचे असताना त्यातील बारकावे सुष्मिता सेन यांनी बिनचूक वठवले आहेत.

सुष्मिता सेन यांच्या चेह-याच्या हावभावपासून, त्यांचा पेहराव, त्यांच्या चालण्या-बोलण्याची लकब या अत्यंत हुबेहुब गौरी सावंत यांनाच प्रत्यक्षदर्शी पाहतो की काय? याचा अनुभव देतात. सुष्मिता सेन यांनी साकारलेली गौरी सावंत तुमच्या पर्यंत पोहोचवणार नसून ती तुम्ही स्वतः पहा. ‘ताली’ हक्कासाठी, संरक्षणासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांची कहाणी नक्की पहा.

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे
पत्रकार, मुंबई
९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.