निळू फुलेंची मुलगी गार्गी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

0

 

मुंबई ;- अनेक कलाकारांनी विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. आता मराठी मनोरंजनविश्वातील अजून एक लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या गार्गी फुलेने राजकीय पक्षात प्रवेश केले आहे.

नुकतेच गार्गी यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत त्यांचे नवीन राजकीय करियर सुरु केले आहे.

गार्गी यांच्या पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. या प्रवेशानंतर गार्गी फुले यांनी सांगितले की, “मागील अनेक दिवसांपासून माझी अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. जेव्हा मला या प्रवेशाबद्दल विचारणा झाली तेव्हा लगेच हो उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि त्यांचे विचार आहेत तेच विचार माझ्या वडिलांचे निळू फुले यांचे होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते. त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस योग्य न्याय देईल असे मला वाटते.”

पुढे गार्गी फुले म्हणाल्या, “राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊन प्रवाहात येईल. आता फक्त किनाऱ्यावर बसून पाहायचे नाही आहे. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचे मी ठरवले आहे. तरुणांना वाटते राजकारणात यावे आणि बदल व्हावा त्यानुसार माझा सुद्धा प्रयत्न असेल.”

Leave A Reply

Your email address will not be published.