सार्वजनिक जागी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याविरुद्ध कारवाई

0

जळगाव ;- अमली पदार्थ समजल्या जाणार्या गांजाचे सेवन मोकळ्या जागी करणाऱ्या एका तरुणावर ख्वाजामिया दर्ग्याजवळ १२ रोजी कारवाई करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील ख्वॉजामिया दर्गा परिसरात असलेल्या एका भिंतीच्या आडोश्यात रहिम निसार बिस्ती (वय-३७) रा. शाहू नगर, जळगाव हा तरूण अवैधरित्या गांजाचे सेवन करत असतांना शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री आढळून आला. पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करत नशा करणारे साहित्या हस्तगत केले. त्यानंतर पोकॉ कैलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रहिम बिस्ती याच्या विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.