शिरसोली येथील शेतातून मोबाईलची चोरी ;गुन्हा दाखल

0

जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला लागून असलेल्या एका शेतातून 7 हजार ९०० रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार ४ ऑगस्ट रोजी घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की देवानंद अमरसिंग पावरा वय 23 राहणार शिरसोली हे शेती व्यवसाय करीत असून त्यांचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने ४ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार घडला असून पावरा यांनी 12 रोजी याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुंडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.