रिक्षा चालकाच्या बँक खात्यातून सव्वा लाख काढून फसवणूक

0

फैजपूर;- यावल तालुक्यातील मारूळ येथील रिक्षा चालकाच्या बँक खात्याच्या क्रेडिट कार्ड मधून वेळोवेळी एक लाख 28 हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने काढून फसवणूक केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यावल तालुक्यातील मारूळ येथे राहणारे रिक्षा चालक सुरेश भिका तायडे वय 52 यांच्या फैजपूर येथे स्टेट बँकेत पाच जुलै 2023 रोजी ते गेले असता त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे नसल्याचा प्रकार त्यांना समजला. दरम्यान त्यांना ६ जानेवारी २०२३ रोजी एका मोबाईल वरून ओटीपी नंबर घेऊन व त्यांचा आधार कार्डचा फोटो घेऊन या क्रमांकाचे व्हाट्सअपवर टाकायला लावल्याने त्यांच्या खात्यातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वस्तू खरेदी करून एक लाख 28 हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी यावल पोलीस स्टेशनला धाव घेऊन अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.