कासोदयातून १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळविले

0

एरंडोल;- तालुक्यातील कासोदा येथून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या खबरीवरून कासोदा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कासोदा येथे राहणारी १६ वर्ष वयाची मुलगी ही घरातून 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पेपरला जळगावला जाते असे सांगून निघून गेली अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या पत्नीने तिला मोबाईलवर संपर्क साधून विचारपूस केली असता मुलीने मी एरंडोल बस स्टॉप ला आहे असे सांगून फोन बंद केला तिच्याशी वारंवार संपर्क साधूनही तिचा मोबाईल बंद आल्याने तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सपने योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.