“गांधी-गोडसे एक युद्धचा” ट्रेलर रिलीज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या टीझरची चर्चा होती. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि नथूराम गोडसे (Nathuram Godse) यांच्या विचारधारेतील युद्धाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. अभिनेते दीपक अंतानी (Deepak Antani) यामध्ये गांधींच्या भूमिकेत आहेत. तर मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) या चित्रपटात गोडसेंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

गांधी आणि गोडसे यांच्या विचारधारेतील युद्धासोबतच प्रेक्षकांना या चित्रपटात स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचं विश्व पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिशा संतोषी (Tanisha Santoshi) पदार्पण करत आहे.

गोडसेच्या भूमिकेविषयी काय म्हणाले चिन्मय मांडलेकर?
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान चिन्मय त्यांच्या भूमिकेविषयी सांगतात, “सरांनी मला भेटायला बोलावलं, तेव्हा 10-15 मिनिटं आमच्यात चर्चा झाली. त्यांनी मला विचारलं की, भूमिका करशील का? मला काही कल्पनाच नव्हती. मी विचारलं की कोणती भूमिका साकारायची आहे? तर ते म्हणाले गोडसे. मला वाटलं त्यानंतर काही ऑडिशन्स होतील आणि मग निर्णय होईल. मात्र त्यांनी माझ्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच केला होता.” “राजकुमार संतोषी यांचा चाहता म्हणून मी या चित्रपटासाठी खूप खुश आहे. कारण बऱ्याच वर्षांनी मला त्यांचा त्यांच्या चित्रपटात येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.