लोकशाही न्यूज नेटवर्क
रस्त्याने १७ वर्षीय तरुणी पायी चालत असताना एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मंगळवारी १० रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थी ही जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातून जात होती. यादरम्यान 42 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन विद्यार्थीच्या समोर येऊन तिच्यासोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंग करणाऱ्या राजेंद्र विश्वनाथ भगत वय 42 याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे पुढील तपास करीत आहेत.