धरणगाव ;- तालुक्यातील नांदेड येथे एका बावीस वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला सुताची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईताराम नान्या बारेला वय 22 राहणार भांपुरा तालुका शेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश असे मयत युवकाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , इताराम बारेला हा नांदेड येथेराहायला. असून तो निंबच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याला मयत स्थितीत दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.