मोठा निर्णय ! राज्यात ‘या’ नागरिकांना ST चा प्रवास मोफत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting)पार पडली  यामध्ये पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास (Free ST Bus Service) करता येणार आहे. तसेच राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांचा तीन टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantracha Amrut Mahotsav) वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देखील मिळणार आहे. आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण देखील मिळणार आहे. याबाबत मागणी केली जात होती.

या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात  येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यामुळे या सणावर दुःख कोसळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.