शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा भार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे असलेल्या खात्यांची (Maharashtra Ministers Portfolio) जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं (Maharashtra Cabinet) खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या खात्याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.