कामाची बातमी ! आता सर्वांना मोफत रेशन मिळणार नाही

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Prime Minister Garib Kalyan Anna Yojana) अंतर्गत मोफत रेशन दिले जात होते. कोरोना संकटाच्या काळात 81.3 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला. आता मोदी सरकारने (Modi Government) देशातील 80 कोटींहून अधिक रेशनकार्डधारकांना (Ration Card Holders) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 2023 मध्ये मोफत अन्नधान्य वाटपाची घोषणा केली आहे.

कोविड (Covid 19) काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांनाही मोफत रेशन मिळत होते. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता फक्त गरीब रेशनकार्ड धारकांनाच गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे. सरकारने एप्रिल 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी 1 जानेवारीला 138 एलएमटी गहू आणि 76 एलएमटी तांदूळ स्टॉकमध्ये असणे आवश्यक आहे. यावेळी ते त्याहून अधिक आहे. 15 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय स्टॉकमध्ये सुमारे 180 एलएमटी गहू आणि 111 एलएमटी तांदूळ उपलब्ध होते. यामुळेच सरकारने 2023 मध्येही मोफत रेशन वितरणाची योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.