धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावातील खंडेराव नगरजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने धरणगाव येथील ४५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. प्रमोद रूपचंद पाटील (वय ४५, रा. पद्मालय नगर, धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रमोद पाटील हे धरणगाव शहरातील पद्मालय नगरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होतो. ते खासगी कामासाठी ते नाशिक येथे गेले होते. गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ते नाशिकहून जळगाव येथे येण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. जळगाव शहरातील खंडेराव नगराजवळ सकाळी ६ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी आणि हरीष डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खिश्यातील कागदपत्राच्या आधारे मयताची ओळख पटली. खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मयतच्या पश्चात पत्नी बबिता आणि मुलगा कृष्णा असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.