Monday, January 30, 2023

पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या, सामूहिक बलात्कारानंतर शीर..

- Advertisement -

पाकिस्तानमधील सिंझोरो गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हिंदू महिलेची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करून शीर धडावेगळं केल्याची भयंकर घटना घडली आहे. दया भील (वय ४०) असं त्या महिलेचं नाव होतं. या महिलचं डोकं धडावेगळं करून तिचे स्तन कापण्यात आले होते. इतकेच नव्हे तर चेहरा आणि शरीरावरची त्वचाही सोलून काढण्यात आली होती.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या बातमीनुसार, या महिलेला चार मुलं आहेत. द पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला हिंदू खासदार कृष्णा कुमारी यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी पीडितेच्या गावात जाऊन तिच्या कुटुंबीयांची, तसंच गावकऱ्यांची भेट घेतली.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे जियाला अमर लाल भील यांनी केलेल्या दाव्यानुसार, या महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतला मृतदेह बुधवारी एका शेतात सापडला. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं असून, अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

- Advertisement -

कृष्णा कुमारी यांनी मृत महिलेच्या गावाला भेट देऊन चर्चा केली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे, ‘दया भील या 40 वर्षांच्या विधवा हिंदू महिलेची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह अत्यंत वाईट स्थितीत आढळला. तिचं डोकं धडावेगळं झालेलं होतं. तिच्या डोक्यातलं सगळं मांस बाहेर आलेलं होतं. सिंझोरो आणि शाहपूरचकर या दोन्ही ठिकाणचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मीदेखील तिच्या गावाला भेट दिली.’

तसेच जागरण या माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार, संबंधित महिलेची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा शिरच्छेद करण्यात आला. तसंच, तिचे स्तन कापून टाकण्यात आले. एवढं झाल्यानंतरही हे कृत्य करणाऱ्यांचं समाधान न झाल्याने नंतर तिची त्वचाही सोलण्यात आली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे