जळगावातील वकिलाच्या चार बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने घातला ४१ हजारांचा गंडा

0

जळगाव;- कुरिअरमधे पार्सल अडकून पडले असल्याचे सांगून एका वकिलाच्या चार बँकांच्या खात्यातून रक्कम वेळोवेळी काढून ४१ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बीजे ,मार्केट येथे राहणारे निखील विजय भोलाणे वय ३४ हे वकिलीचा व्यवसाय करीत असून त्यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्रमांकावर कुरियर आपले कुरुयार पार्सल अडकून पडल्याचे सांगून त्यांच्या मोबाईलवर मेसेज लिंक पाठवून भोलाणे यांच्या एसबीआय,बँक ऑफ इंडिया , कॅनरा बँक आणि इंडियन बँक या चार बँकांच्या खात्यातून वेळोवेळी ४१ हजार ६९७ रुपये रक्कम काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरु अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोहेकॉ महेंद्र पाटील तपस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.