गुजरातवर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

गुजरातवर चक्रीवादळाचा (Hurricane) धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रातून निघणाऱ्या या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 36 तासांत बिपरजॉय उग्र रूप धारण करू शकते. त्याचा परिणाम गुजरातसह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात दिसून येईल. सध्या ते गुजरातमधील पोरबंदरपासून 800 किमी अंतरावर आहे. धोका लक्षात घेता गुजरातच्या सर्व बंदरांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे. सर्व किनारे रिकामे केले जात आहेत. वादळाचा धोका लक्षात घेता उत्तर गुजरातमधील बंदरांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बिपरजॉय उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या बंदरांवर एक नंबरचा सिग्नल जारी करण्यात आला आहे. सौराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी 30 ते 40 किमी वेगाने वारेही वाहत आहेत. किनारपट्टी भागात वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने उत्तर आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर डिस्टंट कॉशिनरी-1 सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या पोर्टलनुसार, समुद्रात खोल दाब निर्माण झाल्यावर बंदरावर डीसी-1 सक्रिय होते.

Leave A Reply

Your email address will not be published.