आयएनआयएफडी जळगांव ने खान्देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा -सीईओ अनिल घोसला

आयएनआयएफडी इन्स्टिटयूटचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

0

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील रिंग रोड परिसरातील आयएनआयएफडी इन्स्टिटयूटचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. फॅशन डिझाईन व इंटिरियर डिझाईनचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पदव्या बहाल करण्यात आल्या. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आयएनआयएफडी सीईओ अनिल घोसला व संचालिका संगीता पाटील उपस्थित होते तर ॲड. प्रमोद पाटील, अमर डेअरीचे संचालक अमर खत्री यांची देखील उपस्थिती समारंभाला लाभली.

संचालिका संगीता पाटील यांनी बोलतांना सांगितले की, आयएनआयएफडी ने आजच्या वेगाने सुसंगत राहून, फॅशन व इंटिरियर डिझाइन शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. आयएनआयएफडी जळगांव साठी हा ऐतिहासिक दिवस आहे. आयएनआयएफडी जळगांव चे आतापर्यंत दहा हजार विद्यार्थी पास आउट झाले असून ते आज स्वतःचा बिझनेस तसेच नॅशनल, मल्टी नॅशनल कंपनीत कार्यरत आहे. आयएनआयएफडी जळगांवच्या वाढत्या आलेख मुळे पालकांचा विश्वास कायम आहे. फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रात देशातच नव्हे तर विदेशातही रोजगार उपलब्ध होतो. उद्याचा भारत हा नव तरुणांच्या हातात जाईल, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवाहाबरोबर जाणे गरजेचे असल्याचे सांगत, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आयएनआयएफडी सीईओ अनिल खोसला यांनी बोलतांना सांगितले की, आयएनआयएफडी जळगावने कमी दिवसात डिझाईन क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पाहता आयएनआयएफडी जळगावच्या संचालिका संगीता पाटील हे विद्यार्थ्यांना जगावेगळे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात हे आजच्या समारंभाच्या माध्यमातून दिसून येत आहे. आयएनआयएफडी मध्ये शिक्षण घेणाऱ्यांना करिअरच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जात असून, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आयएनआयएफडी मध्ये शिक्षण घेत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा स्वावलंबी बनतो.सोशल मीडियामुळे करिअरचे पर्याय सोपे झाले असून, ॲग्रीकल्चर नंतर सर्वात मोठी इंडस्ट्री ही फॅशन इंडस्ट्री असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी बहारदार गाण्यांवर नृत्य करुन आनंद साजरा केला. आयएनआयएफडी सीईओ व संचालिका यांनी देखील विद्यार्थ्यांना जोड देत, नृत्य केले.

समारंभाचे सूत्रसंचालन लक्ष्मी मलबारी यांनी केले तर खुशी दहाडे यांनी आभार मानले. समारंभ यशस्वीतेसाठी वैशाली पाटील, प्रियंका गडे, इम्रान देशमुख, अक्षय पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.