जळगाव एमआयडीसीत घरफोडी ; ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव ;- एमआयडिसीतील एका बंद घराच्या दरवाजाच्या काडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोकड आणि दोन मोबाईल लांबविल्याची घटना ८ जून ते ९ जून दरम्यान घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , एमआयडिसीतील फौजी ढाब्यासमोर पद्मिनी एन्टरप्राइजेस एन -६६ येथे  श्रीराम दगडू पाटील वय ६२ हे राहत असून त्यांच्या बंद घराचे दरवाजाचे काडी कोयंडा तोडून घरातील २९ हजार रुपयांची रोकड, रेडमी कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल लांबविलाच प्रकार उघडकीस आला . याबाबत श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोना दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.