डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड असलेली बॅग लांबविली ; दोन अज्ञातांवर गुन्हा

0

जळगाव ;- महिला बचत गटाची ६७ हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग अज्ञात दोन जणांनी मिरची पूड फेकून मारहाण करीत लांबविल्याची घटना आटेवाडा ते मोरगाव मार्गे रावेर रस्त्यावर ८ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनाला अज्ञात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , यावल तालुक्यातील आडगाव कासार खेडा येथील रहिवाशी आकाश अनिल पाटील वय ३० हे महिला बचत गटाचे जमविलेतेल ६७ हजार १४३ रुपये असलेली बॅग घेऊन जात असताना अज्ञात दोन व्यक्ती मोटारसायकलवर येऊन त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून डोळ्यात मिरची टाकून जबरदस्तीने बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना आटेवाडा ते मोरगाव रावेर रस्त्यावर ८ जूनला घडली . याप्रकरणी आकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनला अज्ञात दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.