ठेकेदाराचे आमिष दाखवून शेतकऱ्याची साडे नऊ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;-फोरसाईट इंटरप्राइजेस प्रा. ली. या कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमल्याचे सांगून प्रत्यक्षात काहीच काम दिले नसल्याने आणि अनामत राक्क्म म्हणून साडे नऊ लाखांत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून दोन कंपन्यांसह तीन व्यक्तींविरुद्ध रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शिवकॉलनी येथे राहणारे संजीवकुमाए दिनकर सरोदे वय ४५ हे शेती व्यवसाय करीत असून त्यांनी मेसर्स फॉरसाईट आणि फॉर साईट इंटरप्राइजेस प्रा. ली. या दोन कंपन्यांसाठी ठेकेदार म्हणून काम करण्यासाठी संशयित अजिंक्य विलास भोईर , राजन पांडुरंग खाडे, रमेश रामशंकर गुपता सर्व रा. बालस्मृती बिल्डिंग मुलुंड वेस्ट मुंबई यांनी फोरसाईट इंटरप्राइजेस प्रा. ली.या दोन क्रमांकाच्या कंपनीत सरोदे यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमले असल्याचे सांगून सरोदे यांनी संशयित तिघांवर विश्वास ठेऊन ९ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतेच काम न मिळाल्याचे लक्षात येऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संजीव कुमार सरोदे यांनी दोन कंपन्यांसह तीन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तपस पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.