जळगावच्या वृद्धाची दोन लाखात ऑनलाईन फसवणूक

0

जळगाव;- येथील इंटरनेटवरून प्ले स्टोअर मधील ॲप डाऊनलोड करून मोबाईलचे पूर्ण नियंत्रण घेऊन एकाने एक लाख 95 हजार 342 बचत खात्यातून ऑनलाईन वळवून फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सेवानिवृत्त कर्मचारी असलेले व भूषण कॉलनी येथील रहिवासी सुधीर श्रीधर इंगळे वय 64 यांना 20 जानेवारी 2024 रोजी अज्ञात व्यक्तीने विश्वास संपादन करून सुधीर इंगळे यांना प्ले स्टोअर वरील ॲप डाऊनलोड करून त्यांच्या मोबाईलचे नियंत्रण घेऊन त्याच्या बँक बचत खात्यातून एक लाख 95 हजार 342 रुपये ऑनलाईन काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी सुधीर इंगळे यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून अध्यात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.