पळासखेडा ग्रामपंचायत अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

0

भडगाव ;- तालुक्यातील पळासखेडा ग्रामपंचायत मध्ये 22 जुलै 2011 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान शौचालयाच्या बांधकाम न करता अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आदींवर शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी अशोक दामू खैरनार वय 48 राहणार पीपल बँक कॉलनी भुसावळ यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तत्कालीन ग्रामसेवक जीभाऊ पाटील, तत्कालीन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल आणि मंगलकोर भरत सिंग पाटील यांनी 22 जुलै 2011 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान वेळोवेळी पळासखेडा तालुका भडगाव गावातील शासनामार्फत मंजूर 207 शौचालय बांधकामाची परवानगी असताना 19 लाभार्थ्यांच्या शौचालयाचे बांधकाम न करता व तीन लाभार्थ्यांना दुबार लाभ देऊन प्रत्येकी 12 हजार रुपये प्रमाणे दोन लाख 64 हजार रुपयांचा अपार करून शासनाची फसवणूक केल्याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला२५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अशोक खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहे को संजय पाटील करीत आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.