व्यवसायात अधिक नफा देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची साडे पाच लाखांमध्ये फसवणूक

0

जळगाव ;- व्यावसायात गुंतवणूक करून अधिक नाफा देण्याचे आश्वासन देऊन शहरातील टेलिफोन नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडेपाच लाखांमध्ये फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून याबाबत सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आश्विन केशवलाल पटेल (वय-४०, रा. टेलिफोन नगर जळगाव) हे व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ नोव्हेंबर ते १० जानेवारी दरम्यान त्यांना फेसबुकवरील व्हिक्टोरिया ओव्हेन नावाच्या तरुणीने व्हाट्सअप क्रमांकावरून संपर्क साधून त्यांना एका रसायन कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले . त्यांचा विश्वास संपादन केल्यानांतर आश्विन पटेल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ५ लाख ६४ हजार ऑनलाईन उकळले . फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आश्विन पटेल यांनी शनिवारी १३ जानेवारी रोजी जळगाव येथील सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.