धूमस्टाईलने दुचाकीवर आलेल्या दोघांनी वृद्धेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लांबवीले

0

भुसावळ ;- शहरातल्या जामनेर रोड वरील गजान महाराज मंदिराजवळून एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, विजया हरी सपकाळे वय ६२ रा. जामनेर रोड भुसावळ ह्या जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरी तोडून पसार झाले. याबाबत विजया सपकाळे यांनी बाजारपेठ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.