भुसावळात भांडणाच्या कारणावरून एकास चाकूने वार करून लोखंडी पाईपने मारहाण

0

भुसावळ ;- जुन्या भांडणाच्या कारणावरून भुसावळच्या एका अंडा भुर्जीची गाडी चालविणाऱ्या तरुणावर चाकूचे वार करून जखमी केले. तसेच इतर दोघांनी लोखण्डी पाईपने मारहाण करून दुखापत केल्याची घटना खडका रोड येथे १३ रोजी घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अजिमोद्दीन शेख वाय ३२ हा तरुण अंडाभुर्जीची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्याला १३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी काफील खान उर्फ बंटी शकील खान ,रेहान शकील खान आणि शादाब खान शकील खान या तिघांनी फिर्यादी अजिमोद्दीन शेख याचा लहान भाऊ रेसोद्दीन शेख व इतर दोघे यांच्या सोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून लोखंडी पाईपने मारहाण केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि सुदर्शन वाघमारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.