१४ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

ओळख पटू नये म्हणून केले असे काही...

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लातूरमधील उदगीर येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय शाळकरी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नराधमांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला आहे. सदर घटनेमुळे उदगीर हादरलं आहे.

मिळालेल्या अधीक माहितीनुसार, कुमठा येथे एका १४ वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी १२ वाजता समोर आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे. आपल्या मुलाचा कोणीतरी खून केला आहे. असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

संतोष १० जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला तो नंतर परतलाच नाही. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. १३ जानेवारी रोजी कुमठा शेत शिवारात या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. आपल्या मुलाला पाहून त्याच्या आई बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरल्याच्या संशयावरून या मुलाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींची क्रूरतेने त्याचा जीव घेतला. त्याची ओळख कोणाला पटू नये यासाठी आरोपींनी त्याचा चेहरा विद्रुप केला. इतकेच नाही तर, त्यांनी मुलाचे केस देखील कापले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात १३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.