डिंकाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

0

यावल ;-अवैद्यरित्या काढलेले डिंक काढून चोरट्या मार्गाने दुचाकीवरून वाहतुक करतांना वन विभागाच्या गस्ती पथकाने तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली रूईखेडा मार्गावरील रात्रीच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत मुद्देमालासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील मोहमांडली ते रूईखेडा मार्गावरील रस्त्यावर २५ मार्च २०२४ रोजी यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे व यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नीन फंटागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रकाश बारेला, वनरक्षक कृष्णा शेळके, वनरक्षक गोवर्धन डोंगरे, वनरक्षक जितेन्द्र सपकाळे व कर्तव्यावर असलेले वनमजुर यांच्या सहभागाने ही कारवाई केली.

संशयीत आरोपी हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या सुपर सप्लेंडर या दुचाकीने वनक्षेत्रातुन अवैद्यरित्या काढलेले सलई जातीचे डिंक छुप्या पध्दतीने वाहतुक करीत असतांना आढळून आला. रात्रीच्या गस्ती असलेले वन विभाग पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता संशयीत आरोपी हा अंधाराचा फायदा घेत १४ हजार रूपये किमतीची दुचाकी व ७ हजार रूपये किमतीचे ३६ किलो सलई जातीचे डिंक असे १९ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल सोडून पसार झाला दरम्यान वन विभागाकडून होत असलेल्या या कारवाईमुळे वृक्षांची तोड व महागडया डिंकाची चोरटया मार्गाने वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.