चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांचा अर्ज दाखल (पहा व्हिडीओ )

0

चंद्रपूर ;- महायुती आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असून मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीची छोटेखानी विजय संकल्प सभा पार पडली. त्यानंतर रॅलीच्या स्वरूपात सुधीर मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिका कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. सभेत बोलताना मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील जनतेला आवाहन केलं.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सुरेश धानोरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने यावेळी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या वेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.