देवझीरी वनक्षेत्रात अवैधरित्या वृक्ष तोडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला; परप्रांतीय व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल

0

यावल– तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्र अंतर्गत वन जमीनीवर वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याचा शेजारील मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांचा डाव वन विभागाने उधळला असून याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच दीड लाखांचे वृक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी १२ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.

वन खात्याच्या प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, देवझिरी वनक्षेत्रातील परिमंडळ देवझिरी अंतर्गत नियतक्षेत्र देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मधील (पाटी कॅम्प व हंडयाकुंडया कॅम्प) लगतच्या भागात अज्ञात इसमांनी रात्र अपरात्री राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केली होती. सदर घटनेबाबत वनरक्षक देवझिरी पुर्व (अ.कार्य) यांनी त्यांचेकडील प्रथम रिपोर्ट क्र. ०२/२०२४ दि.१ फेब्रुवारी मधील वृक्षतोडीबाबत सुमारे दीड लक्ष रूपयांचे सागवान लाकूड जप्त केले. या बाबत वनगुन्हे जारी करुन भारतीय वनअधिनियम.१९२७ चे कलम २६ (१) अ, ड, फ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. या जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी टाकण्यात आलेले झाडे घटनास्थळी पडून होते.

वनगुन्हयातील अज्ञात आरोपी हे फरार असुन आरोपींचा शोध घेण्याबाबत व मुददेमाल हा वनक्षेत्र देवझिरी डेपो येथे ठेवण्यात आलेला आहे आलेला आहे. ९ रोजी सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजी) चोपडा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी, क्षेत्रीय कर्मचारी व ५१२ कर्मचाऱ्यांसह नियतक्षेत्र देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मधील अवैध वृक्षतोड झालेल्या क्षेत्राची पाहणी केली होती. तसेच दि.११ रोजी उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव यांनी देखील वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी, क्षेत्रीय कर्मचारी व ५१७७ स्टॉफ यांचेसह नियतक्षेत्र देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मधील अवैध वृक्षतोड झालेल्या क्षेत्राची पाहणी करुन क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या होत्या.

दरम्यान, १२ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा(प्रा, व पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा यांनी घटनास्थळी जावून भेट झालेल्या अवैध वृक्षतोडीची जागेवर जावून पाहणी केली.

घटनेबाबत तात्काळ आरोपींचा शोध घेवून सति विरुंध्द गुन्हा दाखल करणे बाबत सुचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात वन खात्याने नागरिकांना आवाहन करत वनगुन्हे बाबत कांहीएक माहिती असल्यांस वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट १९२६ या संकेतस्थळावर कॉल करुन माहिती दयावी व वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी जंगलाची तोड करु नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान, सदर अतिक्रमणाचा प्रयत्न करणारे आदिवासी हे मध्यप्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अनुषंगाने मध्यप्रदेशाच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांशी संपर्क साधून गुन्हेगारां चा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.