फार्म हाऊसमध्ये चोरी करणाऱ्या भामट्याला अटक

0

जळगाव:-  बुधली धरण परिसरात फार्म हाऊस येथे अज्ञात चोरट्याने साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून एका संशयित तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता कोठडी सुनावण्यात आले आहे.

विजयकुमार जयसिंग कोसोदे यांचे फार्म हाऊस आहे. ९ ते १० फेब्रुवारी दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी साडेसात हजार रुपयांच्या मशीन आणि वायर असा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास करीत होती. संशयावरून पोलिसांनी आबा प्रकाश भिल (वय २४, रा. बुधली धरण, शिरसोली, जळगाव) याला अटक केली आहे. त्याने विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको समाधान टहाकले, सहाय्यक फौजदार अधिकार पाटील, जितेंद्र राठोड, शुद्धोधन ढवळे, मुकेश पाटील, प्रदीप ठाकूर आदिनी तपास केला.

Leave A Reply

Your email address will not be published.