फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; आठ जणांचा मृत्यू…

0

 

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तामिळनाडूतील विरुधुनगर येथे शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जण ठार तर तीन जण जखमी झाले. प्राथमिक तपासाचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये महिलांचाही समावेश असून स्फोटाचे कारण शोधले जात आहे. ही घटना वेंबकोट्टई पोलीस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी घडली.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विरुद्धनगर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.