महिलेची छेड काढल्याप्रकरणी मारहाण केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गोजरे (ता.भुसावळ) गावात महिलेची छेड काढल्याचा रागातून एकाला झालेल्या बेदम मारहाणीत एकाच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. विनोद गंभीर कोळी (वय २७) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

गोजरे गावातील रहिवाशी रामलाल प्रभाकर डोळे यांच्या बहिणीची छेड काढल्याचा रागातून आज शुक्रवारी (दि.१६) सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान संशयित रामलाल दोडे यांनी विनोद कोळी याला विश्वासात घेऊन त्याला दुचाकीवर बसवून गोजरे शिवारातील शेतात नेऊन जबर मारहाण केली. असा आरोप आहे.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विनोद गंभीर कोळी याला तसाच शेतातच सोडून संशयित रामलाल प्रभाकर डोळे यांचे विनोदच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारास सांगितले की, मी विनोदला मारले आहे तो शेतात पडून होता. त्यानंतर जखमी विनोदच्या परिवाराने शेताकडे धाव घेत त्याला उपचारासाठी तात्काळ ट्रामा केअर सेंटर भुसावळ येथे हलविले.

जखमी विनोद याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान विनोद कोळी यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. प्रकाराने गोजरे गावात खळबळ उडाली आहे.

तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्य्क पोलीस निरीक्षक अमोल पवार, पो.उ.निरीक्षक पूजा अंधारे, पोलीस हवालदार संजय तायडे, युनूस शेख, दिपक जाधव, विठ्ठल भुसे, प्रेम सपकाळे, राहुल महाजन, जगदीश भोई आदीनी घटनास्थळी जाउन संशयित रामलाल प्रभाकर डोळे याला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.