‘टी 20 वर्ल्ड कप’ अगोदरच बीसीसीआयचा ‘हा’ मोठा निर्णय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रिकेटच्या त्यांना पुढील काही महिन्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. विविध संघ सध्या द्विपक्षीय मालिका खेळत आहे. नंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमानिमित्ताने सर्व खेळाडू हे आयपीएलसाठी भारतात येतील. जवळपास 40-50 दिवस ही स्पर्धा चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे ‘यूएसए’ आणि ‘वेस्ट इंडिज’ मध्ये करण्यात आला आहे. वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही महिन्या आधीच बीसीसीआय अलर्ट मोडवर आली आहे.

आयपीएल स्पर्धेत अनकॅप्डसह अनेक कॅप्ड खेळाडूंना आयपीएल दरम्यान दुखापती होतात. आता टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलनंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहे. आयपीएलमध्ये या खेळाडूंना दुखापत होऊन ते वर्ल्ड कप मधून बाहेर होऊ नये, याची खबरदारी म्हणून बीसीसीआय सचिव ‘जय शाह’ यांनी खबरदारी घेतली आहे. तसेच आयपीएल मध्ये सर्व संघांना ताकीद दिली आहे.

जय शाह यांनी आयपीएल आधी खेळाडूंचा वर्क लोड पाहता फ्रेंचाईजींना अलर्ट केल आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत म्हटले आहे. आयपीएल ४५० वार्षिक करार प्राप्त खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंट नियमावलींचं पालन करावे लागेल. बीसीसीआय सर्वोच्च संस्था आहे. बीसीसीआयचा निर्णय फ्रेंचाईजींना बंधनकारक आहे. तसेच वार्षिक करारातील खेळाडू टीम मधून बाहेर असेल तर, त्यांना रणजी ट्राफि खेळावे लागेल. असेही जय शहा यांनी सांगितला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.